1
1
1
2
3
प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक 23 जुलै रोजी शिक्षण व्यवस्थेतील कथित NEET पेपरफुटी प्रकरण, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात कथित NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला.

यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत संबंधित मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात धरणे आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.